ऋषभ पंतला भेटण्यासाठी उर्वशी पोहोचली हॉस्पिटलमध्ये? यूजर्सने केले ट्रोल

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कुठेही जाते किंवा काहीही पोस्ट करते. यूजर्स तिला क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या नावाने ट्रोल करतात.

आता पुन्हा एकदा ऋषभ पंतमुळे उर्वशी चर्चेत आली आहे.

उर्वशीने गुरुवारी इंस्टा स्टोरीवर मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा एक फोटो शेअर केला आहे.

याच हॉस्पिटलमध्ये ऋषभ पंत उपचारासाठी दाखल आहे.

उर्वशीच्या पोस्टनंतर युजर्सने याचा संबंध थेट ती ऋषभ पंतला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली होती, असा लावला आहे.

आता उर्वशी खरोखरच ऋषभ पंतला भेटली की नाही, याची माहिती मिळालेली नाही.

परंतु, स्वस्तातली प्रसिध्दी असे म्हणत युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

तर, एकाने हॉस्पिटलचा फोटो शेअर करून काय फायदा? असेही म्हंटले आहे.

ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

पण दोघांनीही हे नातं कधीच स्वीकारलं नाही. याउलट दोघांचे शीतयुद्ध सोशल मीडियावर चर्चेत राहिले.