‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री वनिता खरात आज लग्नबंधनात अडकली आहे.

मोजक्याच नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली.

वनिता व सुमितच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी नेसली होती.

गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचे खूपच सुंदर दिसत आहे.

सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला होता.

वनिता व सुमितच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

त्यांच्या मेहेंदी व हळदी सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते.

वनितावर सेलिब्रिटी व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वनिताचा नवरा सुमित एक एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.