Vikram Gokhale : जेष्ठ अभिनेते 'विक्रम गोखले' यांच्या कारकीर्दीचा आढावा

Team Lokshahi

विक्रम गोखले यांनी रंगमंचासह मराठी चित्रपट सृष्टी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला.

विक्रम गोखले यांनी १९९७ मध्ये 'परवाना' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

गोखले यांनी 2010 मध्‍ये 'आघात' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्‍दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

उत्तम अभिनयसाह त्यांनी अनेक समाजकार्य सुध्दा केली. त्याच्या कुटुंबाचे चॅरिटेबल फाउंडेशन अपंग सैनिक, कुष्ठरोग्यांची मुले आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य पुरवते.

त्यांनी ७० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबतही काम केले आहे.

'हम दिल दे चुके सनम', 'अग्निपथ' , 'नटसम्राट' 'बाळा गाऊ काशी अंगाई' अश्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी प्रत्येक भूमिकाही अगदी बारकाईने आणि उत्तमरीत्या वठवली.

त्यांच्या अभिनयातील कौशल्यांमुळे ते अनेक पुरस्काराचे मानकरी ठरले.

फेब्रुवारी 2016 मध्ये, घशाच्या आजारामुळे, गोखले यांनी रंगमंचावरील क्रियाकलापांमधून निवृत्ती घेतली, तरीही त्यांनी चित्रपटाचे काम सुरूच ठेवले.