प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर का असतात रेषा; जाणून घ्या यामागचं कारण

Siddhi Naringrekar

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या रेषा तुम्ही पाहिल्या का?

का बरं असतील त्या? या रेषांमागे एक खास कारण आहे.

घराबाहेर पडताना किंवा कुठेतरी प्रवास करताना तहान लागली की, लगेच आपण दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतो.

या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्याही आपल्यासाठी खूप उपयोगी पडतात.

प्लास्टिकच्या बाटलीवरील या रेषा बाटलीच्या सुरक्षेसाठी असतात.

या बाटल्या Transparent Disposable Plastic ने तयार केल्या जातात.

या पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी सॉफ्ट प्लास्टिकचा वापर केला जातो.

त्यामुळे या रेषा नसतील तर या बाटल्या ने-आण करताना फुटू शकतात.

त्यामुळे या रेषा पाण्याच्या बाटलीचं रक्षण करतात.

तुम्ही ज्यावेळी दुकानातून ती प्लास्टिकची पाण्याची बाटली विकत घेता.

त्यावेळी हातात धरताना ग्रिप मिळावी म्हणूनही या रेषा पाण्याच्या बाटलीवर दिलेल्या असतात.