Smartphone Facts: स्मार्टफोनबाबत तुम्हाला माहित नसलेले ८ आश्चर्यकारक फॅक्ट्स

Dhanshree Shintre

जगभरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 6 अब्जाहून अधिक झाली आहे, तंत्रज्ञानाची क्रांती सुरू आहे.

IBM Simon हा जगातील पहिला स्मार्टफोन 1994 साली बाजारात उपलब्ध झाला होता.

लोकं सोशल मीडिया आणि व्हिडिओ पाहण्यासाठी दररोज सरासरी 3 ते 5 तास स्मार्टफोन वापरतात.

टॉयलेट सीटपेक्षा स्मार्टफोनवर जास्त बॅक्टेरिया आढळू शकतात, त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

स्मार्टफोन नसल्यास अनेकांना घाबरल्यासारखे, अस्वस्थ किंवा गोंधळलेले वाटते.

लाखो फोन पाण्यात पडून खराब होतात, ज्यामुळे वॉटर-रेझिस्टंट स्मार्टफोनची मागणी सतत वाढते.

आजचा स्मार्टफोन Apollo 11 च्या चंद्र मोहिमेतील संगणकापेक्षा जास्त शक्तिशाली आणि क्षमतेने समृद्ध आहे.

लोकांचा 90% टक्के हिस्सा सकाळी उठल्यावर पहिल्या 10 मिनिटांत लगेच फोन तपासतात.