म्युझिकल कपल अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल

Shweta Shigvan-Kavankar

प्रसिध्द गायिका पलक मुच्छाल आणि संगीत दिग्दर्शक मिथुन या म्युझिकल कपलने रविवारी लग्नबंधनात अडकले आहेत.

पलक मुच्छाल आणि मिथुन अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती.

पलक मुच्छालने लग्नानंतरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लग्नाचा फोटो शेअर करताना पलक मुच्छालने लिहिले की, आज आम्ही दोघे कायमचे एकत्र झालो आहोत.

पलक मुच्छाल आणि मिथुन दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते.

तिच्या आयुष्यातील खास क्षणी पलकने लाल रंगाचा घागरा घातला होता. तर, मिथुनने ऑफ व्हाइट शेरवानी परिधान केली होती.

पलक मुच्छाल आणि मिथुनवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लग्नानंतर पलक आणि मिथुनने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही ठेवले आहे.

म्युझिक इंडस्ट्रीशिवाय या जोडप्याने बॉलिवूड आणि टीव्हीच्या अनेक बड्या स्टार्सना रिसेप्शनमध्ये आमंत्रित केले आहे.