अभिनेता आदित्य सातपुते अडकला लग्नबंधनात

Shweta Shigvan-Kavankar

उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाने सोशल मीडियावर आदित्य सातपुतेने स्वत:ची ओळख निर्माण केली.

नुकताच त्याचा नेहा कदम सोबत पुण्यात थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.

आदित्यने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून जवळपास २५ हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले.

त्यांच्या लग्नाचे फोटो आता व्हायरल झाले आहे.

जसे कि हुरपरी, ट्रिंग ट्रिंग, फक्त बायको पाहिजे, लयं गुणाची हाय, रूप साजरं. त्यातले सर्वच म्युझिक अल्बम सुपरहिट झाले आहेत.

त्याचा स्वतःचा A/7 स्टुडिओ नावाचा क्लोथींग ब्रॅंड देखिल आहे.

आदित्यचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

मनसेचे वरिष्ठ नेते अनिल शिदोरे, वसंत मोरे, बापू वागस्कर, किशोर शिंदे आणि सर्व पदाधिकारी पुणे शहर तसेच संगीतकार प्रशांत नाकती आणि नादखुळा म्युझिक टीम, संगीतकार देवदत्त बाजी, अभिनेत्री राधा सागर आणि सर्व कंटेंट क्रिएटर इंडस्ट्री लग्नसोहळ्यात उपस्थित होते. तसेच, अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते आदित्य आणि नेहाच्या लग्नाला हजेरी लावली होती.