Akshay Kumar : 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटासाठी अक्षयची सोमनाथ मंदिरात खास पूजा

shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (manushi_chhillar) यांनी गुजरातमधील (Gujarat) सोमनाथ मंदिरात (Shree Somnath Temple) जाऊन पूजा केली आहे. यावेळी त्याच्याबरोबर दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्ववेदीही (Chandraprakash Dwivedi) उपस्थित होते.

अक्षयने प्रमोशनचा एक भाग म्हणून वाराणसी (Varanasi) येथे गंगेचे दर्शन करून पूजा केली आहे.

Akshay Kumar

तसेच सोमनाथ मंदिराच्या अधिकृत ट्विटर पेजवरून अक्षय आणि टीमचे फोटो शेअर करून त्याला सुंदर असे कॅप्शनही देण्यात आले आहे.

Akshay Kumar

अक्षय कुमार हा त्याच्या 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय या ऐतिहासिक चित्रपटामध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 3 जूनला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar

या चित्रपटामध्ये अक्षय बरोबर अभिनेता सोनू सूद आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar

'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे.

Akshay Kumar