Siddhi Naringrekar
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आरआरआर फेम राम चरण काही दिवसांपूर्वीच बाबा झाला.
उपासना कमिनेनी २० जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिला.
त्यांच्या लेकीचं बारसं संपन्न झालं.
सध्या त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राम चरण आणि उपासनाने या बारशाचे काही फोटो सोशल मीडिया वरून शेअर केले.
त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव ‘क्लिन कारा कोनिडेला’ असं ठेवलं आहे.
थाटामाटात हे बारसं पार पडलं.
या नावाचा अर्थ आध्यात्मिक जागृती करणाऱ्या उर्जेचं प्रतिक असा आहे.
हे बारसं अत्यंत पारंपारिक पद्धतीने पार पडलं.