‘रमा-राघव’ मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यातही आहे तितकीच ग्लॅमरस

Shweta Shigvan-Kavankar

छोट्या पडदयावर नवीन मालिका सुरु होत आहेत.

कलर्स मराठीवर 'रमा राघव' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या मालिकेमध्ये रमाच्या भूमिकेत अभिनेत्री ऐश्वर्या शेटे दिसणार आहे.

तिने याआधी फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत काम केलं आहे.

या मालिकेतील सोनालीच्या भूमिकेतून ऐश्वर्या घराघरात पोहोचली.

सोनाली या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

अभिनेत्री असण्यासोबतच ऐश्वर्या उत्तम नृत्यांगना आहे.

याशिवाय झी युवा वाहिनीवरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’या मालिकेतही रिचाची भूमिका तिने साकारली होती.

‘घाडगे & सून’ या मालिकेत ही ऐश्वर्याने काम केले होते.

ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.