आकाश ठोसर अडकणार लग्नबंधनात! पत्रिका छापली; नवरी पाहिली का?

Shweta Shigvan-Kavankar

'सैराट' या चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर घराघरात पोहोचला.

आकाश ठोसर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

त्याने नुकताच शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या पोस्टमध्ये तो नवरदेवाच्या लूकमध्ये दिसत आहे.

तर, त्याच्या शेजारी अभिनेत्री सायली पाटील ही वधूच्या लूकमध्ये दिसत आहे.

आणखी एका पोस्टमध्ये लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.

यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

यामुळे त्यांचे लग्न झाले की का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मात्र, हे लग्न खरे नसून आगामी चित्रपटातील भाग असल्याचे सांगितले जात आहे.

आकाश आणि सायली हे 'घर बंदुक बिरयाणी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. हा चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.