shweta walge
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूड इंडस्ट्रीत दहा वर्षे पूर्ण केली आहेत. 19 ऑक्टोबर 2012 रोजी आलियाने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि सध्या ती चित्रपटसृष्टीतील निर्माता-दिग्दर्शकांच्या पहिल्या पसंतीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
बॉलिवूडमध्ये दहा वर्षे पूर्ण केल्यावर आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवरून एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हसत हसत कॅमेर्यासमोर पोज देताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - "आज 10 वर्षे...आणि प्रत्येक दिवसासाठी मी खूप कृतज्ञ आहे!!! मी आणखी चांगले होण्याचे वचन देते - आणखी खोलवर स्वप्ने - अधिक परिश्रम करा !!! !! यासाठी धन्यवाद जादू, प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम".
चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आलिया भट्टच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. वरुण धवनपासून ते जान्हवी कपूर आणि झोया अख्तरपर्यंत हार्ट इमोटिकॉन्स टाकले आहेत.
धर्मा मूव्हीजने प्रतिक्रिया देताना लिहीले, "गुलाबी आंखे जो तेरी देखी, दीवाने सारे दिल हो गया १० वर्षांपूर्वी! आमच्या शाइनिंग स्टूडेंटचे अभिनंदन. आलिया भट्टचा पहिला चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर' करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने निर्मित केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. सोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिच्या प्रेगनन्सीचा आनंद घेत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट लवकरच 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या हातात 'बैजू बावरा', रॉकी आणि 'रानी की प्रेम कहानी' सारखे बॉलिवूड प्रोजेक्ट आहेत.