shamal ghanekar
अक्रोडमध्ये (Walnut) अनेक पोषक घटक असतात. जे आपल्याला आजारांपासून लढण्यासाठी मदत करते.
अक्रोडमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच लोह, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात.
मेंदूच्या कार्यक्षतेसाठी अक्रोड हे खूप फायदेशीर असते.
अक्रोड हे जर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाल्याने त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. त्यामुळे अनेक आजारांच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.
अक्रोड खाणे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर मानले जाते.
अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते जे आपली हाडे मजबूत करते. त्यामुळे अक्रोड खाणे शरीरासाठी खूप गरजेचे आहे.
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅलरीज आढळतात जे आपले वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अक्रोडाचे सेवन केल्याने वजन कमी आणि नियंत्रणास ठेवण्यास मदत होते.
अक्रोड जेवणानंतर खल्याने जेवण पचन होण्यास मदत होते.