अंकिताने शेअर केले रोमॅंटीक फोटो; चाहते म्हणाले, एवढा शो ऑफ का?

Shweta Shigvan-Kavankar

प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती अनेकदा पती विकी जैनसोबतचे फोटो शेअर करत असते.

अलीकडेच, अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत मकर संक्रांत साजरी केली.

अंकिता लोखंडेने तिच्या पतीसोबत काढलेले काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अंकिता लोखंडे मराठी लूकमध्ये दिसली. तिने काळ्या आणि सोनेरी रंगाची साडी घातली होती, जी पिवळ्या आणि लाल दुपट्ट्यासह स्टाईल केली होती.

तर विकी जैन काळ्या कुर्ता-पायजामासह निळ्या रंगाच्या नेहरू जॅकेटमध्ये सुंदर दिसत होता.

एकीकडे अंकिता आणि विकीचे हे फोटो पाहून सेलेब्सपासून चाहत्यांना आनंद झाला. तर दुसरीकडे तिला शो ऑफ केल्याने लोकांनी ट्रोल केले.

फोटोशूट न करताही हा सण साजरा केला जाऊ शकतो, असे यूजर्सचे म्हणणे आहे.

काही यूजर्स असेही म्हणतात की अंकिता नेहमीच शो ऑफ करते. त्यांनी काहीतरी खाजगी ठेवावे.

14 डिसेंबर 2021 रोजी अंकिता आणि विकीचे लग्न झाले. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.