Riddhi Vanne
महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना गार आणि सुगंधी थंडाई अर्पण करणे शुभ मानले जाते. अनेक मंदिरांमध्येही हा प्रसाद दाखवला जातो. श्रद्धेने अर्पण केल्यास मनःशांती लाभते.
दूधात शिजवलेली मखान्याची खीर शिवपूजेत विशेष मानली जाते. ज्योतिषानुसार यामुळे चंद्राशी संबंधित दोष कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
गोड लस्सीचा नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात, असे मानले जाते. काही ठिकाणी परंपरेनुसार त्यात थोडी भांग मिसळूनही अर्पण केली जाते.
तुपात तळलेला मालपुआ महादेवाला प्रिय मानला जातो. भक्तीभावाने अर्पण केल्यास करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुलतात, अशी श्रद्धा आहे.
हंगामी फळे, रव्याचा किंवा उपवासाच्या पिठाचा हलवा आणि पवित्र भस्म अर्पण केल्याने आध्यात्मिक उन्नतीस मदत होते. हा दिवस साधना आणि भक्तीचा मानला जातो.