भूमी पेडणेकरची बहीणही तिच्यासारखीच ग्लॅमरस; चाहत्यांनी म्हंटले, सेम टू सेम

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री भूमी पेडणेकरची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते.

भूमी नेहमीच तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते

नुकतेच भूमी तिची बहीण समिक्षा पेडणेकरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली.

भूमीची बहीण समिक्षाही तिच्यासारखीच खूप ग्लॅमरस दिसते.

समिक्षाचा चेहरा आणि शरीरयष्टी भूमीशी मिळती-जुळती आहे.

यावेळी भूमी हलक्या तपकिरी रंगाच्या जंपसूटमध्ये दिसत आहे. तर समिक्षा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.

दोन्ही बहिणीमध्ये इतके साम्य आहे की सोशल मीडियावर समिक्षाला भूमीची बॉडी डबल म्हणून संबोधत आहेत.

चेहऱ्याच्या रचनेपासून ते केस आणि हसण्यापर्यंत या दोघींमध्ये अनेक समानता आहेत.

यावर नेटकरी मजेशीर कमेंट करत आहेत. 'आयला सेम टू सेम' असे एका युजरने लिहिले आहे. तर दुसऱ्या युजरने 'ट्विन सिस्टर्स', म्हंटले आहे.