पहा या ८ दिग्गज अभिनेत्यांच्या स्त्री पात्रातील लाजवाब अदा

Team Lokshahi

कमल हसन या ज्येष्ठ अभिनेत्याने ‘मिसेस’ या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित असलेल्या ‘अववाई षणमुगी’ या कॉमेडी चित्रपटात स्त्रीची भूमिका साकारली, आणि आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले.

आशुतोष राणा यांनी 'संघर्ष' या चित्रपटातून स्त्री पात्र साकारून प्रेक्षकांना वेड लावले, आणि या भूमिकेतून ते सर्वोत्तम विलन या पुरस्काराचे मानकरी ठरले.

महेश मांजरेकर यांनी रज्जो चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी महेशच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले.

रितेश देशमुख ने 2014 'हमशकल'या चित्रपटामार्फत एका वेगळ्याच अंदाजात चाहत्यांना मोहित केले, हॉट स्त्री पात्र साकारून नेहमीप्रमाणे आपल्या अभिनयाची छाप सोडली.

'गंगुबाई' या हिट चित्रपटातून 'विजय राज' हे ट्रान्सजेंडर च्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले, विजय राज यांचा हा स्त्री पात्रातील अभिनय प्रेक्षकांच्या फारच पसंतीस पडला.

'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटातून अक्षय कुमार यांनी चित्तथरारक असे स्त्री पात्र साकारले. त्यांचा स्त्री पात्रातील अभिनय पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

शरद केळकर यांनी 'लक्ष्मी' चित्रपटात खऱ्या लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. जो एक नपुंसक आहे. या भूमिकेमुळे चाहते शरद केळकरांचे कौतुक करताना थकत नव्हते.

'रफू चक्कर' या सुपर हिट चित्रपटामध्ये 'रिशी कपूर' यांनी सुंदर रित्या स्त्री पात्र साकारले, आपल्या अदा, सौंदर्य चाहत्यांना घायाळ केले.