MS Dhoni Birthday: Yamaha पासून Ninja पर्यंत; धोनीचे अनोखे बाइक कलेक्शन

Shweta Shigvan-Kavankar

MS Dhoni Birthday: माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

धोनीला क्रिकेटशिवाय बाईकचे मोठ्या प्रमाणात वेड आहे.

त्याच्याकडे विविध प्रकारच्या बाइक्स आहेत.

धोनीकडे विंजेटपासून लेटेस्ट मॉडेल्सपर्यंतच्या बाइक्सचे मोठे कलेक्शन आहे.

धोनीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या काही बाइक्सचे फोटो शेअर केले आहेत.

धोनीकडे Kawasaki Ninja H2, Confederate X132 Hellcat, Kawasaki Ninja ZX-14R, Harley Davidson FatBoy, Ducati 1098, Yamaha RD350, Suzuki Shogun, Yamaha Thundercat, BSA Goldstar, Norton R5R03 आणि AJ5R0 TV बाईकस् आहेत.

त्याने या बाईकसना त्याच्या फार्म हाऊसमध्ये ठेवले आहे.

या बाईकने तो रांचीच्या रस्त्यावर फिरताना दिसतो.

धोनीकडे जवळपास सर्व प्रकारच्या बाइक्स आहेत. पण, सर्वात जुनी यामाहा ही धोनीची आवडती बाईक आहे.