देबिनाचे ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट, बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री देबिना बॅनर्जी लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

नुकतेच तिने ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.

देबिना बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करत असून ती सुपर स्टनिंग दिसत आहे.

यावेळी देबिनाने तिचा मेकअप न्यूड आणि ग्लोईंग ठेवला आहे.

यामध्ये मोकळ्या केसांमध्ये बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेल्या देबिनाची मनमोहक स्टाइल पाहायला मिळत आहे.

देबिनाच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत असून कमेंटसचा वर्षाव होत आहे.

एप्रिल 2022 मध्ये देबिनाने एका मुलीला जन्म दिला होता.