Dark Neck : मान उजळवण्यासाठी 'हे' करा सोपे घरगुती उपाय

Riddhi Vanne

मान का काळी पडते?

घाम, धूळ, उन्हात फिरणे आणि त्वचेवर साचलेला मृत थर यामुळे मान काळवंडते. कधी कधी हार्मोन्समधील बदल किंवा साखरेची समस्या यामुळेही त्वचा जाड व गडद दिसू शकते.

बेसन-हळद लेप

बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून मानेला लावा. १५ मिनिटांनंतर धुवा. त्वचा स्वच्छ व तजेलदार दिसते.

लिंबू आणि मध मसाज

थोडा लिंबाचा रस आणि मध मिसळून हलक्या हाताने चोळा. टॅन कमी होण्यास मदत होते. (संवेदनशील त्वचेसाठी काळजी घ्या.)

कोरफडचा थंडावा

ताजे कोरफडीचे जेल मानेला लावून १५ मिनिटे ठेवा. त्वचा मऊ होते आणि काळेपणा हळूहळू कमी होतो.

साखर स्क्रब

साखर आणि थोडे तेल मिसळून सौम्य स्क्रब करा. मृत त्वचा निघून मान स्वच्छ दिसते.

सनस्क्रीन विसरू नका!

बाहेर पडताना चेहऱ्यासोबत मानेलाही सनस्क्रीन लावा. सूर्यप्रकाशामुळे होणारे काळवंडणे टाळता येते.

शेवटचा सल्ला

दररोज स्वच्छता, भरपूर पाणी, संतुलित आहार आणि योग्य काळजी घेतल्यास मान उजळ व निरोगी राहू शकते. समस्या वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.