Indian Railways : ट्रेनने प्रवास करता? मग भारतीय रेल्वेच्या या मोफत सुविधा नक्की जाणून घ्या

Varsha Bhasmare

प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास टीटीई किंवा हेल्पलाइनवर संपर्क केल्यास जवळच्या स्टेशनवर डॉक्टरांची मदत मिळते.

लाब पल्ल्याच्या गाड्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. स्टेशनवरही मोफत वॉटर बूथ असतात.

व्हीलचेअर, रॅम्प आणि स्टेशन स्टाफची मदत मोफत मिळते.

रेल मदत (139 / Rail Madad App) वर तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाते.

प्रवासात सामान हरवल्यास GRP/RPF कडे मोफत तक्रार नोंदवता येते.

महिला हेल्पलाइन, RPF एस्कॉर्ट आणि सुरक्षित डब्यांची सुविधा मोफत.

अनेक मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी फ्री Wi-Fi सुविधा उपलब्ध आहे.