shamal ghanekar
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू (Shriram Lagoo) यांची आज (16 नोव्हेंबर 1927) जयंती आहे.
डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म साताऱ्यामध्ये झाला.
डॉ. श्रीराम लागू यांना मराठी रंगभूमीवरचे 'नटसम्राट' म्हटले जाते.
1969 साली 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकाच्या माध्यमातून डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी रंगभूमीवरील प्रवासाला सुरुवात केली.
डॉ. श्रीराम लागू यांनी 'नटसम्राट', 'हिमालयाची सावली', 'गार्बो', 'उद्ध्वस्त धर्मशाळा', 'कस्तुरीमृग', 'एकच प्याला', 'आंधळ्यांची शाळा', 'चंद्र आहे साक्षीला', 'प्रेमाची गोष्ट', अशा अनेक नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका गाजवली.
'सिंहासन', 'पिंजरा', 'मुक्ता' अशा अनेक चित्रपटांमध्ये डॉ. श्रीराम लागू यांनी कामही केलं आहे.
फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने डॉ. श्रीराम लागू यांना गौरवण्यात आले आहे.