Riddhi Vanne
होळी हा रंगांचा सण आहे, पण रासायनिक रंग त्वचेस हानी पोहोचवू शकतात.
नैसर्गिक रंग बनवून तुम्ही सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंगांचा अनुभव घेऊ शकता.
लाल रंगासाठी बीटरूट किवा गुलाबपान पेस्ट करून हलके उकळा. त्यांची पेस्ट करुन त्यामध्ये कडधान्याचे पावडर किंवा कॉर्नस्टार्च मिसळा.
पिवळ्या रंगासाठी हळद + बेसन + थोडे पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा.सुर्यप्रकाशात ठेवा म्हणजे पिवळा तयार
हिरव्या रंगासाठी पालक किंवा कोंथीबीरची पानांचा रस का त्यामध्ये कॉर्नस्टार्च किंवा बेसन मिसळा म्हणजे तुमचा हिरवा रंग तयार आहे.
निळ्या रंगासाठी नीळकंठ/कपासाचे फुल घ्या, त्यांन उकळा आणि त्यामध्ये कॉर्नस्टार्च मिसळा म्हणजे निळा रंग तयार
ब्लूबेरी किंवा जांभळ्या फळांचा रस घ्या.. त्यामध्ये कॉर्नस्टार्च मिसळा म्हणजे जांभळा रंग तयार होईल.
सर्व रंग तयार करताना थोडे पाणी किंवा बेसन वापरणे पेस्ट घट्ट ठेवते.
रंग सुकवल्यानंतर हवाबंद बाटलीत साठवता येतात.
नैसर्गिक रंग त्वचेस सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात.