काजोलच्या सौंदर्यावर चाहते फिदा; म्हणाले, अजय पुन्हा लग्न करेल

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री काजोल आजही बॉलिवूडमध्ये प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक आहे.

काजोल तिच्या दमदार अभिनयासाठी तसेच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

पुन्हा एकदा काजोलने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केली आहेत.

यामध्ये काजोलने पिवळ्या आणि काळ्या रंगाचा अतिशय आकर्षक जंपसूट घातलेला दिसत आहे.

काजोल ऑफ-शोल्डर पॅटर्नसह काळ्या जंपसूटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

तुम्हाला माहित आहे का की मधमाशीचे उडणे हे भौतिकशास्त्राच्या सर्व नियमांच्या विरोधात आहे? ते उडते कारण ते करू शकते असा विश्वास आहे. मधमाशी व्हा. तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे तिने कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले असून कमेंटचा पाऊस पडला आहे.

एका चाहत्याने लिहिले की, तुम्ही असेच फोटो पोस्ट करत राहिल्यास अजय देवगणही हार्दिक पांड्याप्रमाणे तुमच्याशी पुन्हा लग्न करेल'.

तर दुसऱ्याने लिहिले की, तू माझा ऑल टाइम क्रश आहेस.