Riddhi Vanne
केतकीचे फूल शिवलिंगावर अर्पण करू नये, कारण ते शिवपूजेसाठी निषिद्ध आहे. या दिवशी शंख वाजवू नये, असे धार्मिक कथांमध्ये सांगितले आहे.
हिंदू परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, म्हणून हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो.
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
2026 मध्ये महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी येणार आहे. या दिवशी उपवास करून शिवभक्ती केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
कोणतीही व्यक्ती हे व्रत करू शकते. अविवाहित मुलींनी व्रत केल्यास चांगला जीवनसाथी मिळतो, असे मानले जाते. पहिल्यांदा उपवास करणाऱ्यांनी काही सोपे नियम लक्षात ठेवावेत.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि व्रताचा संकल्प करावा. शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर बेलपत्र अर्पण करावे. रुईचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि व्रताचा संकल्प करावा. शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर बेलपत्र अर्पण करावे. रुईचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते.
केतकीचे फूल शिवलिंगावर अर्पण करू नये, कारण ते शिवपूजेसाठी निषिद्ध आहे. या दिवशी शंख वाजवू नये, असे धार्मिक कथांमध्ये सांगितले आहे.
पूजेसाठी वापरण्यात येणारे तांदूळ पूर्ण आणि न तुटलेले असावेत. उपवासाच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार टाळावा.
गडद रंगांऐवजी पिवळे किंवा नारंगी कपडे परिधान करावेत, हे रंग शुभ मानले जातात. मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, मध आणि तूप यांचा अभिषेक करावा.