'ही' महिला पोलीस अधिकारी करते मॉडेलिंग, फोटो व्हायरल

Shweta Shigvan-Kavankar

सिक्कीमच्या महिला पोलीस अधिकारी ईक्षा केरुंग यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या मल्टीटॅलेंटची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

ईक्षा केरुंग केवळ पोलीस अधिकारीच नाही तर त्या सुपरमॉडेल, बाइकर आणि राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर देखील आहे.

सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर सुमारे 80 हजार लोक त्याला फॉलो करतात.

ईक्षा यांनी रिअ‍ॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. तिने एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर शोमध्ये आपली चमक दाखवली आहे.

मॉडेलिंगमध्ये रस असण्यासोबतच त्या एक उत्तम बाइकर देखील आहेत.

ईक्षा केरुंग सांगतात की, माझी आवड आणि प्रोफेशन खूप वेगळे आहे. त्यांनी वडिलांचे पहिले गुरू म्हणून वर्णन केले.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही वयाच्या 19 व्या वर्षी पोलीस सेवेत रुजू झालेल्या ईक्षा केरुंगच्या विलक्षण प्रतिभेचे वंडर वुमन म्हणत कौतुक केले आहे. अभिनेत्री मलायका अरोरा हिनेही त्यांचे कौतुक केले.

ईक्षा केरुंग म्हणाल्या की, तुमचा कोणताही छंद असला तरी तो पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे.