राणादा-पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा

Shweta Shigvan-Kavankar

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून राणादा-पाठकबाई घराघरात पोहोचले.

यानंतर अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नाची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का दिला.

हार्दिक-अक्षया डिसेंबर २०२२मध्ये विवाहबंधनात अडकले.

लग्नानंतर अक्षय-हार्दिकचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे.

पुण्यातील राहत्या घरी अक्षया-हार्दिकने गुढी उभारुन पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला.

याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

लग्नानंतरच्या पहिल्याच गुढीपाडव्यासाठी अक्षयाने खास लूक केला होता.

पिवळ्या व हिरव्या रंगाच्या साडीत अक्षया पारंपरिक लूकमध्ये दिसून आली. तर हार्दिकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हार्दिक जोशी लवकरच हार्दिक ‘वेडात मराठे वीर दौ़डले सात’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.