महाराष्ट्रात पोळीसोबतच भाकरीदेखील मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते..तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी अशा कितीतरी धान्यांपासून भाकरी केली जाते. .कोणत्या शारीरिक व्याधींमध्ये कोणती भाकरी गुणकारी ठरते ते पाहुयात. .बाजरी हा मॅग्नेशिअमचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे हार्ट पेशंटने त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा..ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो..नाचणीची भाकरी पोषक तत्वांनी भरलेली, पचायला हलकी असून अॅनिमियामध्ये रक्तवाढीसाठी आहारात अत्यंत उपयुक्त ठरते..थोडक्यात, प्रत्येक धान्यापासून तयार केलेली भाकरी ही शरीरासाठी फायद्याची आहे.