Hina Khan: पिवळ्या साडीत हिना खानची दिलकश अदा

shweta walge

हिना खान ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हिनाने नुकतेच आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हिनाच्या एथनिक लूकने चाहत्यानां घायाळ केले आहे.

या फोटोमध्ये हिनाने पिवळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसली आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

हिनाने पिवळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडीसह हिरव्या रंगाच्या दागिने आणि स्मोकी आय मेकअपने आपला लूक पूर्ण केला आहे.

साडीवर बॅकलेस ब्लाउज, गळ्यात जड दागिने आणि कानात लहान झुमके घातले आहे. हिना संपूर्ण लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

प्रत्येक साडीमध्ये हिनाचा लूक इतका छान असतो की चाहते तीच्या फोटोला कमेन्ट्स आणि लाइक केल्या शिवाय राहत नाहीत.

हिना खान तिच्या बोल्ड स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.