हिना खानचा लेहेंगा-चोलीमध्ये रॅम्पवॉक; नेटकरी संतापले, कारण...

Shweta Shigvan-Kavankar

हिना खान सोशल मीडियावर सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

हिनाचे फोटोशूट असो, रॅम्प वॉक असो, ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना अपडेट करत असते.

हिना खानने अलीकडेच पुण्यातील एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काळ्या-गोल्डन लेहेंगा चोलीमध्ये हिना सुंदर दिसत आहे.

परंतु, नेटकऱ्यांना मात्र हिनााची ही स्टाईल आवडलेली नाही. व त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

रमजानच्या महिन्यात उमराहून परतलेल्या हिना खानच्या फोटोंवर नाराजी व्यक्त करत नेटिझन्स प्रश्न करत आहेत की 'तिला एवढेच करायचे असताना ती उमराहसाठी का गेली?'

दुसऱ्याने लिहिले की 'खुदाई रहम कर'.आणखी एकाने लिहिले की, 'आता हे सर्व कलाकार उमराहसाठी जात नाहीत. ते फक्त फोटोशूटसाठी जातात.'

तर, काही यूजर्स अभिनेत्रीचे कौतुकही करत आहेत.