Drisha Acharya Bridal Look : लग्नासाठी अशी तयार झाली करण देओलची नवरी

shweta walge

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल १८ जून रोजी त्याची गर्लफ्रेण्ड द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकला.

कुटुंबीय आणि काही मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित करण-द्रिशाचा शाही विवाहसोहळा पार पडला.

देओल कुटुंबाने नववधूचे थाटामाटात स्वागत केले. सनी देओलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सून द्रिशाचे स्वागत केले आहे.

लग्नात द्रिशा लाल लेहंग्यामध्ये आणि करण देओल आयव्हरी शेरवानीमध्ये शोभून दिसत आहे.

द्रिशाने प्लंजिंग नेकलाईनच्या लाल लेहंग्यामध्ये खुपच सुंदर दिसत आहे. सोबतच चोकर, मागटीका, झुमके, सोन्याचे कडे आणि लाल बंगड्यासोबत द्रिशानेआपला ब्राईडल लूक पूर्ण केले आहे.

द्रिशाने लग्नात मिनिमल मेकअप कॅरी केला होता ज्यात ती खुप सुंदर दिसत होती.

मिनिमल मेंहदीसोबत द्रिशाने आपला ब्राइडल लूक पूर्ण केला होता. या फोटोमध्ये द्रिश्याने आपली मेंहदी आणि रिंग फ्लोन्ट केला आहे.

करण देओलने चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यशी लग्न केले आहे. या दोघांनी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आर्य समाजाच्या रीतिरिवाजांसह लग्नगाठ बांधली.