Fear Of Flying: विमानात प्रवास करताना घाबरता का? हळूहळू भीती कमी करण्याचे टिप्स वाचा

Dhanshree Shintre

विमान उड्डाण किंवा उतरतानाही अनेक प्रवाशांना भीती वाटते; ही सामान्य समस्या असून त्यावर मात करण्याचे मार्ग आहेत.

विमान प्रवासादरम्यान तुम्हाला भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला ही भीती दूर करण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.

विमान प्रवासात चढताना हलका नाश्ता आणि थंड पेय सोबत ठेवा; यामुळे तुम्ही लक्ष व्यस्त ठेवून आरामदायक राहाल.

डोळे मिटवून खोल श्वास घ्या आणि हळू हळू सोडा; श्वासावर लक्ष देणे मन शांत करण्यास मदत करते.

विमान प्रवासापूर्वी तुमच्या मोबाईलवर एक चित्रपट डाउनलोड करा आणि उड्डाण सुरू होताच तो पाहायला सुरुवात करा.

जर तुम्हाला वाचनाची आवड असेल, तर विमान प्रवासात पुस्तके वाचा; यामुळे मन शांत आणि व्यस्त राहण्यास मदत होईल.

जर फ्लाइटमध्ये एखादी सोबत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधा; बोलणे तुमची चिंता कमी करण्यास आणि मन हलके ठेवण्यास मदत करेल.

जर तुम्हाला विमान प्रवासात उलट्या किंवा गंभीर चिंता होत असतील, तर योग्य औषधे वापरा किंवा प्रवास टाळण्याचा विचार करा.