Angnewadi Jatra : भराडी देवीच्या आंगणेवाडी यात्रेला भक्तांची प्रचंड गर्दी, दर्शनासाठी नऊ रांगा

Riddhi Vanne

कोकणची श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवीच्या आंगणेवाडी यात्रेला आज, ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे.

लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले असून मंदिर परिसरात लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

ही यात्रा पंचांगावर नाही, तर देवीच्या कौलावर ठरते. यंदा देवीने ९ फेब्रुवारीचा दिवस दिला आहे.

अपेक्षित प्रचंड गर्दी लक्षात घेता यंदा नऊ वेगवेगळ्या रांगांमधून दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

आंगणे कुटुंबियांची कुलदैवत असली तरी नवसाला पावणारी देवी म्हणून भराडी आईचं दर्शन सर्व भक्तांसाठी खुले आहे.

भाविकांच्या सोयीसाठी रिक्षा सेवा, एस.टी. बसेस आणि यात्रा विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

धार्मिक वातावरणासोबतच गोंधळ, दशावतार आणि ‘मांडावरचं नाटक’ यामुळे यात्रेला सांस्कृतिक रंग चढला आहे.

नवस, गाऱ्हाणी आणि मनोकामनांसह लाखो भक्त भराडी देवीचं दर्शन घेत आहेत.