Photo : इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे अडकली विवाहबंधनात

Rajshree Shilare

इंडियन आयडॉल १२(Indian Idol 12)ची स्पर्धक आणि उपविजेती गायिका सायली कांबळेने(Sayali kamble)नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सायलीने रविवारी मराठी पद्धतीनुसार बॉयफ्रेंड धवलसोबत लग्न केले.

नुकतेच सायलीचे मेंदी-हळदीचे फोटो व्हायरल झाले होते. सायली कांबळेच्या लग्नात इंडियन आयडॉलमध्ये त्याच्यासोबत असलेले निहाल तौर (Nihal Taur) आणि नचिकेत लेलेही (Nachiket Lele)आले होते.

सायली कांबळेच्या फॅन पेजवरून(fanpage) लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

लग्नात सायलीने पिंक कलरची बॉर्डर असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्याच वेळी, तिच्या वराने म्हणजेच धवलने ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजामा आणि जांभळा फेटा घातला होता.

सायली आणि धवलचा गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये साखरपुडा झाला होता.

साखरपुड्यादरम्यान धवलनने गुडघ्यावर बसून आपल्या भावी पत्नीला अंगठी घातली होती, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सायली कांबळेसोबतचा फोटो शेअर करताना धवलने लिहिले – मी नेहमी तुझ्यासोबत असेन. आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत हसण्यासाठी, तुला प्रेरणा देण्यासाठी आणि तुझ्यावर बिनशर्त प्रेम करण्यासाठी.

सायली कांबळे सध्या सुपरस्टार सिंगरमध्ये(Superstar singer) कॅप्टन म्हणून दिसत आहे.

इंडियन आयडॉलमधील सायलीच्या गाण्याने प्रभावित झाल्यानंतर शोचा खास पाहुणा करण जोहरने(karan Johar)तिला चित्रपटांची ऑफर दिली होती.