Tulsi Plant : तुळस कोमेजतेय का? कारण ओळखा आणि आजच करा हे सोपे उपाय

Varsha Bhasmare

दररोज पाणी देऊनही तुळशीचे झाड का सुकते, असे प्रश्न अनेकांना पडतात.

तुळशीची काळजी कशी घ्यावी?

तुळशीच्या झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण- जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात.

तुळशीच्या झाडावर थेट दव पडू देऊ नये. त्यासाठी कुंडी सावलीत ठेवावी लागेल.

कोणते खत वापरावे? तुम्ही कोणतेही खत वापरले तरी ते महिन्यातून एकदा वापरणे पुरेसे आहे.

तुळशीच्या झाडांना जास्त पाणी देऊ नये. पाणी देण्यापूर्वी माती तपासा. जर माती दोन इंचांच्या आत कोरडी असेल, तरच पाणी द्या.

हळदीचा वापर करा हळद ही एक अँटीबायोटिक आहे. तुळशीसाठी ती वापरल्यास फायदेशीर मानली जाते.

कळ्या काढाव्यात का? तुळशीच्या झाडाला हिरव्या कळ्या असतील, तर त्या काढू नयेत.