जयंत पाटलांच्या सुपुत्राचा विवाह थाटात; पाहा सोहळ्याचे शाही फोटो

Shweta Shigvan-Kavankar

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील आज उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका हिच्यासोबत विवाहबध्द झाला.

प्रतिक आणि अलिकचा विवाह मोठ्या थाटात पार पडला.

या विवाह सोहळ्याला राजकारण्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.

या विवाह सोहळ्यासाठी तब्बल दोन लाख लोकांना निमंत्रण देण्यात आले होता.

यावेळी प्रचंड गर्दी जमल्याचं पहायला मिळाले.

या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, छत्रपती उदयनराजे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब देसाई, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, सभापती नरहरी झिरवळ या नेत्यांची उपस्थिती होती.

प्रतीक पाटील यांनी लंडनमधून इंजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे.

2014 पासून प्रतिक यांनी वाळवा-इस्लामपूर मतदारसंघात राजकीय कारकीर्दीस सुरूवात केली.