सह्याद्री पर्वतरांगेतील कळसूबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून १,६४६ मीटर (५,४०० फूट) उंचीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.कळसूबाईला आदिवासींची कुलदेवता मानले जाते..शिखरावर असलेल्या छोट्या मंदिरात देवीचा मुखवटा असून भाविक तिथे मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात..सर्वाधिक उंचीमुळे या शिखराला "महाराष्ट्राचे एव्हरेस्ट" म्हटले जाते..हे शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर, अकोले तालुक्यात येते..शिखरावर जाण्यासाठी पायथ्याला 'बारी' हे गाव आहे. चढण्यासाठी सुमारे ३ ते ४ तास लागतात..शिखरापर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे चढाई सोपी होते .ट्रेकर्ससाठी हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.