KGF 2 ने केला 400 कोटींचा टप्पा पार

Vikrant Shinde

रॉकिंग स्टार यश म्हणून प्रसिद्ध असलेल्या यश या अभिनेत्याचा KGF Chapter 2 हा सिनेमा सलग चौथ्या अठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

नुकतंच या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

यशच्या KGF या चित्रपटाच्या पहिल्या भागानेही बॉक्स ऑफिसवर अश्याच प्रकारे धुमाकूळ घातला होता.

KGF Chapter 2 या सिनेमाच्या शेवटी KGF या चित्रपटाचा तिसरा भागही प्रदर्शित होणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळे, आता चाहत्यांची उत्सूकता शिगेस पोहोचली आहे.