वेड चित्रपटाची हवा; मात्र 'या' बालकलाकरांच्या अभिनयाचा विसर

Shweta Shigvan-Kavankar

वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.

महाराष्ट्रभर या दादा वहिनीची सध्या हवा पाहायला मिळत आहे.

मात्र या सर्वांमध्ये चित्रपटाच्या नायक नायिकेचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या बालकलाकाराने देखील जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहे.

या मुलीच्या येण्यानेच चित्रपटाला खरा ट्विस्ट येतो. या मुलीमुळेच सत्या आणि श्रावणी एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे ही भूमिका चित्रपटात खूप महत्वाची मानली जाते.

मीरा ही भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे खुशी हजारे.

खुशीच्या जबरदस्त अभिनयाचं देखील कौतुक होत आहे.

खुशी हजारे ही बालकलाकार असून तिने काही नामवंत जाहिरातींसाठी काम केले आहे. हिंदी चित्रपटातून खुशीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.

ऐश्वर्या रायसोबत तिने २०१६ सालच्या सरबजीत या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. विकी कौशल सोबत भूत या हॉरर चित्रपटातही ती झळकली होती. तर जान्हवी कपूरच्या मिली चित्रपटातही ती एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती.

२०२० सालच्या प्रवास या चित्रपटातून खुशीने मराठी चित्रपट सृष्टीत देखील पाऊल टाकले.

नुकत्याच येऊन गेलेल्या आपडी थापडी या चित्रपटात ती श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेच्या मुलीची भूमिका साकारताना दिसली होती.

वेड हा खुशीने अभिनित केलेला तिसरा मराठी चित्रपट आहे.