अथिया शेट्टीच्या फोटोशूटवर केएल राहुल फिदा; कमेंटने वेधले लक्ष

Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलचा रोमान्स सर्वाज्ञात आवडला आहे. दोघेही त्यांच्या चाहत्यांना कपल गोल देत असतात.

अथिया शेट्टीने नुकतेच फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती स्टाईलमध्ये बसलेली दिसत आहे. फोटोंमध्ये अथिया शेट्टी पांढऱ्या रंगाच्या फॉर्मल सूटमध्ये दिसत आहे. पारदर्शक चष्मा घातलेला अथिया खुर्चीवर बसली आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये तिने ब्राऊन कलरचा लेदर कोट घातला आहे

तिसऱ्या फोटोमध्ये चेरी कलरचा चष्मा आणि कोट आहे.

सान्या मल्होत्रा, रिया कपूर, दिवा धवन, हार्दिक पांडे आणि आकांक्षा रंजन कपूर यांनी या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

याशिवाय अथियाचा बॉयफ्रेंड केएल राहुलनेही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. राहुलने हार्ट आणि फायर इमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

राहुलसोबत अथिया शेट्टीच्या लग्नाच्या चर्चाही बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. 2023 मध्ये दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.