Kriti Sanon : क्रिती सेननचा Short Hair, शोल्डर रिव्हीलिंग ड्रेस मधला बोल्ड लुक पाहिला का?

shweta walge

क्रिती सेनन लवकरच वरुण धवनसोबत 'भेडिया' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. 'भेडिया'मधला क्रितीचा लूक तिच्या इतर चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा आहे.

admin

'भेडिया'च्या ट्रेलर लाँचवेळी क्रिती सेननसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यादरम्यान अभिनेत्रीचा हॉट लूक पाहून सगळेच वेडे झाले आहेत. क्रितीचा असा लूक यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.

क्रिती सेनॉनचा हा सिझलिंग अवतार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंटरनेटवर लोक अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

admin

ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये क्रिती सेननने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर रिव्हीलिंग ड्रेस परिधान केला होता. हाई स्लिट ड्रेसमध्ये क्रितीने तिचे टोन्ड पाय सुंदरपणे दाखवले. अभिनेत्रीने न्यूड मेकअप, लहान केस आणि उंच बूट घालून तिचा लूक पूर्ण केला.

admin

'भेड़िया' चित्रपटाबद्दल बोलले तर, 'स्त्री'नंतर अमर कौशिक पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून तो 'क्रिचर कॉमेडी' हा नवा जॉनर प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ट्रेलरमध्ये त्याचे व्हीएफएक्स चांगलेच पसंत केले जात आहे.

'भेडिया' 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये वरुण धवन आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त दीपक डोबरियाल देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.