बिग बजेट चित्रपट वादात, बायकॉट ट्रेंडमध्ये 'हा' चित्रपट अव्वल

Sagar Pradhan

लायगरमध्ये साऊथ स्टार विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. याची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहर सतत लक्ष्यावर आहे. या कारणास्तव पूर्वी #boycottliger हा ट्रेंड होता. 25 ऑगस्टला हा रिलीज होणार आहे.

Movie 2022 | Team Lokshahi

'कभी ईद कभी दिवाली' ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही काळापासून खान कलाकारांच्या चित्रपटांना सातत्याने विरोध होत आहे.

Movie 2022 | Team Lokshahi

पठाणही बहिष्कारापासून लांब राहिलेला नाही. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत.

Movie 2022 | Team Lokshahi

आदिपुरुषमध्ये प्रभाससह सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या भूमिका आहेत. सैफच्या अस्तित्वामुळे या चित्रपटालाही विरोध होत आहे. पुढील वर्षी 12 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Movie 2022 | Team Lokshahi

करण जोहरच्या प्रोडक्शनचा आणखी एक चित्रपट ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्रह्मास्त्रचा ट्रेलर येताच त्याच्या एका सीनवरून वाद निर्माण झाला होता. या चित्रपटालाही बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.

Movie 2022 | Team Lokshahi

विक्रम वेधमध्ये हृतिक रोशन, सैफ अली खान आणि राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत. सैफ अली खानच्या अस्तित्वामुळे सोशल मीडियावर वापरकर्ते त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Movie 2022 | Team Lokshahi

तेजस ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौतचा चित्रपट अजूनही बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये टिकून आहे.

Movie 2022 | Team Lokshahi

अक्षय कुमारचा आगामी ‘राम सेतू’ हा चित्रपटही हिंदू संघटनांच्या निशाण्यावर आहे. चित्रपटात चुकीचे तथ्य जोडण्यात आल्याचा आरोप आहे. हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

Movie 2022 | Team Lokshahi