मुकेश अंबानी बनले आजोबा; श्लोका अंबानीने दिला मुलीला जन्म

Shweta Shigvan-Kavankar

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी एक छोटी परी आली आहे.

त्यांची मोठी सून श्लोका मेहता अंबानी यांनी बुधवारी मुलीला जन्म दिला आहे.

इंस्टाग्रामद्वारे अंबानी कुटूंबियांनी ही माहिती दिली आहे.

आकाश अंबानी आणि श्लोका यांचे हे दुसरे अपत्य आहे. त्यांना पृथ्वी अंबानी नावाचा २ वर्षांचा मुलगाही आहे.

एप्रिल महिन्यात नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उद्घाटन समारंभात श्लोका मेहताच्या गरोदरपणाची माहिती दिली होती.

या सोहळ्यात श्लोकाने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला होता.

गेल्या काही आठवड्यांपासून अंबानी कुटुंबीय अनेक मंदिरांमध्ये जाताना दिसले. श्लोकाही पती आकाश अंबानी आणि सासरे मुकेश अंबानीसोबत बाबुलनाथ मंदिरात गेली होती.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांनी मार्च 2019 मध्ये लग्न केले.