थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी नाशिकमधील 'या' सहा वाईनयार्ड्सला भेट द्याच

Siddhi Naringrekar

व्हॅलोनी (Vallonne Vineyards)

नाशिकपासून 45 मिनिटांच्या अंतरावर हायवेजवळ व्हॅलोनी वाईनयार्ड्स आहे. जिथे ना तुम्हाला इंटरनेट एक्सेस आहे ना फोन कनेक्शन. निसर्गाचा, चांगल्या जेवणाचा आणि चांगल्या वाईनचा आस्वाद या वायनरीला मिळतो.

विनसुरा वाईनयार्ड्स (Vinsura Vineyards)

नाशिक शहराजवळील विंचूर गावानजीक विंचूर वाईन पार्क आहे. या ठिकाणी पर्यटकांना विविध प्रकारच्या वाईन्सचं टेस्टींग करता येतात. त्याचबरोबर फॅमिली ट्रिपचे आयोजन देखील करता येऊ शकत.

टायगर हिल वाईनयार्ड्स रिसोर्ट (Tiger Hill Vineyards Resort)

नाशिक-मुंबई मार्गावर विल्होळी गावानजीक ही वायनरी आहे. या परिसरातील टायगर हिल वाईनयार्ड्स रिसोर्ट आणि स्पा हे एक मस्त रिसोर्ट आहे. जे नाशिक सिटीपासून मुंबईच्या रस्त्यालगत आहे. सुंदर इंटिरिअर्स, प्रसन्न वातावरण आणि वाईन्समुळे इथला स्टे नक्कीच मेमोरेबल असेल.

सोमा वाईनयार्ड्स (Soma Vineyards)

गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गंगावर्हे शिवारात ही वायनरी वसलेली आहे. शहरी वातावरणापासून किंवा रोजच्या धावपळीच्या जगण्यातून शांतता हवी असेल तर इकडे नक्की भेट द्या.

यॉर्क वाईनरी (York Winery)

नाशिक शहराजवळील सावरगाव परिसरात ही यॉर्क वायनरी आहे. सावरगाव परिसरातील यॉर्क वाईनरीचा हा परिसर देखील फारच सुंदर आणि गंगापूर बॅकवॉटरजवळ आहे. वाईन टूर तब्बल 30-40 मिनिटांची असून इथे मिळणारं फूडही खूपच बजेट फ्रेंडली असल्याचे सांगितले जाते.