न्यासा नाही तर 'हे' आहे अजय-काजोलच्या मुलीचे खरे नाव

Shweta Shigvan-Kavankar

अजय देवगण आणि काजोल यांच्याप्रमाणेच मुलगी न्यासा देवगण नेहमीच चर्चेत असते.

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक न्यासा आहे.

फॅशन स्टेटमेंट्सपासून पार्ट्यांमधील व्हिडिओंपर्यंत न्यासा नेहमीच लक्ष वेधून घेते

ती बॉलीवूडच्या अशा स्टार किड्सपैकी एक आहे ज्यांचे नाव अनेकदा अनेकांना गोंधळात टाकते.

अनेकदा तिला 'न्यासा, निशा' म्हणून संबोधतात.

त्याच वेळी, स्टार किडने पहिल्यांदाच तिचे नाव चुकीचे संबोधल्यानंतर तिचे योग्य नाव काय आहे हे सांगितले.

अजय काजोलच्या मुलीने माझे नाव निसा आहे, असे सांगितले आहे.

सिंगापूरच्या ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर निसा स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहे.