Nusrat Bharucha Birthday: नुसरत भरुचाचा असा आहे फिल्मी सफर

shweta walge

मोठ्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा (Nusrat Bharucha).

Admin

इंडस्ट्रीतील सर्वात आकर्षक आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक, नुसरत भरूचा तिच्या ड्रेसिंग स्टाईलने तिच्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करते.

Admin

बॉलिवूडमध्ये (Bollywood) जवळपास 10 वर्षांचा यशस्वी प्रवास करणारी ही अभिनेत्री आज म्हणजेच 17 मे रोजी 37 वर्षांची झाली आहे.

Admin

नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीतून (TV industry) केली होती आणि ती 2002 मध्ये ZeeTV च्या 'किटी पार्टी' मालिकेत दिसली होती.

Admin

नुसरत भरुचाने 2011 मध्ये कार्तिक आर्यनसोबत (Karthik Aryan) लव रंजन दिग्दर्शित 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश होते आणि तिची कार्तिकसोबतची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली होती.

Admin

नुसरतचा 'प्यार का पंचनामा 2'हा चित्रपट हिट ठरला नंतर 'सोनू के टीटू की स्वीटी' घेऊन आली, हा तिचा 100 कोटींचा गल्ला पार करणारा पहिला चित्रपट होता.

Admin

नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखली जाते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यांना खूप पसंत केले जाते.

Admin

नुसरतचा अंकशास्त्रावर खूप विश्वास आहे आणि तिच्या नावाचे स्पेलिंग बदलण्यामागे हेच कारण असल्याचे सांगितले जाते.

Admin