'मैं हूं अटल' चित्रपटातील पंकज त्रिपाठीचा फर्स्ट लूक समोर

Shweta Shigvan-Kavankar

अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस असून देशभरात साजरा होत आहे.

यानिमित्त त्यांच्यावरील चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

'मैं अटल हूँ' असे चित्रपटाचे नाव असून अभिनेता पंकज त्रिपाठी अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे.

चित्रपटातून समोर आलेल्या या पोस्टरमध्ये पंकजची स्टाईल आणि त्याचा लूक हुबेहूब वाजपेयींसारखा दिसत आहे.

पंकजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये चार वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

कवी, पंतप्रधान, राजकारणी आणि सज्जन अशा अटलबिहारी वाजपेयींच्या व्यक्तिरेखेत पंकज दिसतो.

पंकजने ट्विटरवर लिहिले की, अटलजी यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकार करण्यासाठी मला माझ्या व्यक्तिमत्त्वावर संयमाने काम करणे आवश्यक आहे. उत्साह आणि मनोबलाच्या जोरावर मी माझ्या नव्या भूमिकेला न्याय देऊ शकेन, असा मला ठाम विश्वास आहे.

पंकजला अटलबिहारी वाजपेयींच्या लूकमध्ये पाहून चाहते खूप खूश झाले आहेत.

उत्कर्ष नैथानी यांनी 'मैं अटल हूं' दिग्दर्शित करत आहे. 'मैं अटल हूं' डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे.