प्राजक्ताचे ग्लॅमरस फोटोशूट; म्हणाली, 'मार्केटमध्ये अशा पोझ...'

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते.

चाहत्यांमध्ये प्राजक्ताची चांगलीच क्रेझ आहे.

चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतेच प्राजक्ताने एक फोटोशूट केले असून तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यात तिने फ्लोरल ब्लेझर व पॅन्ट घातली असून तिने सिल्वर रंगाची ज्वेलरीची घातली आहे.

यावेळी तिने खुपच सिंपल मेकअप केला आहे.

या फोटोंमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

तसेच, तिने फोटोना दिलेली कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

'गिरे तो भी टांग उपर पोझ...नाही नाही गंमत करतेय. मार्केटमध्ये अशा पोझ चालू आहेत म्हणून दिली', अशी कॅप्शन प्राजक्ताने दिली आहे.

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.