प्रिया बापटचे बोल्ड फोटोशूट; चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने अभिनयानं मनोरंजन सृष्टीमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

अभिनयाबरोबरच प्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

प्रिया सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

प्रियानं तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

यामध्ये प्रिया एकदम हॉट अंदाजात दिसत आहे.

प्रिया बापटचे हे फोटोशूट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

नेटकऱ्यांनी प्रियाच्या या हॉट फोटोशूट व्हिडिओवर भरभरून कमेंट केल्या आहेत.

काहींना प्रियाचा हा हॉट अंदाज आवडला आहे तर काहींनी तिच्या या फोटोशूटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'हा फक्त प्रियाचा स्वॅग...' तर आणखी एकानं लिहिलं आहे की, 'फ्लॉवर नही फायर है'

तर, 'हे करण्याची खरंच गरज होती का?' असा सवाल एकाने विचारला.