आजोबांसोबत नातवाची सवारी! राज ठाकरेंनी किआनला दाखवली शिवाजी पार्कची रोषणाई

Shweta Shigvan-Kavankar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी नातू किआनसोबत गाडीतून फेरफटका मारला.

शिवाजी पार्कची रोषणाई दाखवण्यासाठी राज ठाकरे यांनी गाडीतून किआनला फिरवलं.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यावेळी अमित ठाकरे आणि मिताली ठाकरेदेखील उपस्थित होते.

आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाचा राज ठाकरेंचा हा अंदाज अनेकांना आवडला असून अनेकांनी या फोटोला मोठी पसंती दर्शवली आहे.

5 एप्रिल रोजी अमित ठाकरे आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.